TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आळंदी कार्तिकी सोहळ्यानिमित्त टपरी, पथारी, फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई नको : बाबा कांबळे

पिंपरी: आळंदी कार्तिकी सोहळ्यानिमित्त टपरी, पथारी, फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई केली जाते. हा त्यांच्यावर अन्याय आहे. स्थानिक भूमिपुत्र यांना वगळून इतरमोठ्या विक्रेत्यांनी जागा उपलब्ध करून दिली जात आहे. हे चुकीचे असून आळंदी कार्तिकी सोहळ्यानिमित्त टपरी, पथारी, फळभाजी विक्रेत्यांवर कारवाई नको,फळभाजी विक्रेते यांच्यावर कारवाई केल्यासकार्तिकी वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होईल. त्यांना फळभाजी व जीवन आवश्यक वस्तू मिळणार नाहीत, फळभाजी विक्रेते हे सेवा देणारी माणस, त्यांना गुन्हेगार ठरवू नका अशी मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने आळंदी पोलिस स्टेशन व आळंदी नगर परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांनची भेट घेतली. व त्यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.

या वेळी संघटनेच्या महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सरचिटणीस प्रकाश यशवंते, आळंदी व खेड तालुका संयोजक ऍड. प्रियस सोनवणे, आळंदी शहराध्यक्ष सुलतान शेख, उपाध्यक्ष रामदास मेत्रे, मुकुंद दिंनडाळ, महादेव भालेराव, मंचक यादव, तानाजी दौंडकर, दत्तात्रय जांभळे, सुनील राऊत, गोरख कलाटे, ज्ञानेश्वर शेटे आदी उपस्थित होते.

बाबा कांबळे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा सुरू होत आहे. या निमित्ताने लाखो वारकरी, भाविक, भक्त आळंदी येथे सोहळ्याच्या निमित्ताने येतात. या वेळी प्रसाद, फळ, फुल, अष्टगंध, बुक्का, कुंकू, प्रसाद विकणारे विक्रेते देखील मोठ्या संख्येने आळंदीमध्ये येतात. आळंदी नगर परिषदेच्या वतीने स्थानिक जागेचा निलाव करून सदर जागा कार्तिकी निमित्त येणाऱ्या बाहेरील मोठे विक्रेत्यांना देण्यात येते.

तसेच स्थानिक भूमिपुत्र टपरी, पथारी, हातगाडीधारक फळे आणि फुल विक्रेते भाजी विक्रेत्यांवर मात्र कारवाई केली जाते.
कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाच्या बैठका सुरू असून प्रशासकीय नियोजनाच्या व कार्तिकी सोहळ्याच्या बैठकीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना व विक्रेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात येते. हा गोरगरीब कष्टकरी जनतेवर होणारा अन्याय आहे.

स्थानिक भूमिपुत्र, गोरगरीब, कष्टकरी जनतेवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशारा टपरी पाथरी हातगाडी पंचायत संस्थापक अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला. रस्त्याला आडकाठी न होता प्रदक्षिणा रोडच्या अतील अंतर्गत रस्त्यावरती नगरपरिषदेशेजारील मंडई, व झाडे, बाजार या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना जागा देण्यात यावी. त्यांना व्यवसाय करण्याची मुभा असावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या बाबत प्रशासनाने टपरी पथारी हातगाडी पंचायत या संघटनेस विश्वासात घ्यावे. अन्यथा वारीमध्ये येणाऱ्या वारकरी भक्तांची गैरसोय होईल त्यांना ताजे व सकस फळभाजी मिळणार नाही, यामुळे प्रशासनाने फळभाजी विक्रेत्यांचे योग्य नियोजन करावे कार्तिकी वारी मध्ये जमणाऱ्या लाखो भाविक भक्तांना सेवा देणे त्यांना फळभाजी पुरवणे हे अनेक वर्षातील सोहळ्याचा एक भाग आहे हे प्रशासनाने लक्षात घेतले पाहिजे असे देखील बाबा कांबळे म्हणले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button