ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

​नवी सांगवी प्रभाग क्रमांक 31 ‘धनुष्यबाणाची’ गर्जना; महिला सक्षमीकरण आणि विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जोर

नवी सांगवी | प्रतिनिधी

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुरळा उडाला असून, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये शिवसेनेच्या (धनुष्यबाण) उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. “नवी सांगवीचा एकच निर्धार, नवी सांगवीचाच उमेदवार” अशी घोषणा देत शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रभागात जनसंपर्क मोहिमेचा धडाका लावला आहे. या मोहिमेला ठिकठिकाणी नागरिकांचा, विशेषतः महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

​महिलांच्या रोजगारावर विशेष भर

​प्रचारात महिला उमेदवारांच्या भूमिकेने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी बोलताना महिला उमेदवार मनिषा आश्विन खुडे आणि आरती संभाजी भेगडे यांनी महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्याला सर्वोच्च प्राथमिकता देण्याचे आश्वासन दिले.

त्या म्हणाल्या, “महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी आम्ही बचत गटांच्या माध्यमातून घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहोत. आजवर केलेल्या कामाची पावती म्हणून मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

​बालेकिल्ल्यात भगवा फडकणारच

​नवी सांगवी हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद आणि तरुणाईचा जोश यामुळे प्रचारादरम्यान मोठा उत्साह दिसून येत आहे. प्रशांत बबनराव कडलग आणि मेघराजराजे सिध्दार्थ लोखंडे यांनीही स्थानिक प्रश्नांवर आपली ठाम भूमिका मांडली असून, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि थेट जनसंवाद यावर त्यांनी भर दिला आहे. “आप्पांच्या शिलेदारांनी” यावेळी प्रभाग ३१ मध्ये भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हेही वाचा      :        लिहिलेलं पुसता येतं, पण कोरलेलं नाही..; रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखची पोस्ट 

शिवसेना (धनुष्यबाण) पॅनेलचे उमेदवार

​(अ) मनिषा आश्विन खुडे (अनुसूचित जाती)
​(ब) प्रशांत बबनराव कडलग (नागरिकांचा मागासवर्ग)
​(क) आरती संभाजी भेगडे (सर्वसाधारण महिला)
​(ड) मेघराजराजे सिध्दार्थ लोखंडे (सर्वसाधारण)

​मतदारांना आवाहन

उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले आहे की, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विश्वासासाठी
गुरुवार, दि. १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत ‘धनुष्यबाण’ या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करावे.

​बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराचे आश्वासन.

स्थानिक समस्या सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा.

प्रचारात तरुणांचा आणि महिलांचा अभूतपूर्व सहभाग.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button