Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राज्यस्तरीय शालेय युनिफाईट स्पर्धेत थेरगावच्या ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’चे यश

चिन्मय मस्केला सुवर्ण, तर उत्तम भाटीला कांस्य पदक

​ पिंपरी-चिंचवड: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत पनवेल येथे आयोजित ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय युनिफाईट स्पर्धेत थेरगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत शाळेच्या चिन्मय मस्के याने सुवर्ण पदक (Gold Medal), तर उत्तम भाटी याने कांस्य पदक (Bronze Medal) पटकावून शाळेच्या

शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

​दोन्ही खेळाडूंनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत राज्यस्तरावर ही पदे मिळवली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार, सचिव अशोक मोरे, खजिनदार सुरेखा पवार, मुख्याध्यापिका विद्या नाईक व नायगम एग्निस तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे विशेष कौतुक केले.

हेही वाचा –  पंकजा मुंडेंचा सातारा दौरा अचानक रद्द, पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, नेत्यांच्या हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

​या प्रसंगी श्री. विजय पवार यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करतानाच शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करावी. शिक्षण आणि खेळ यांची योग्य सांगड घातल्यास एक यशस्वी खेळाडू आणि उत्तम व्यक्तिमत्व घडवता येते.”

​हे दोन्ही खेळाडू प्रशिक्षक यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. माने यांनीही खेळाडूंच्या मेहनतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

​”आमच्या शाळेतील चिन्मय आणि उत्तम या खेळाडूंनी राज्यस्तरावर मिळवलेले यश हे त्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे फळ आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी खेळांची नितांत गरज आहे. शिक्षणासोबतच खेळाची सांगड घातल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि एक शिस्तबद्ध आयुष्य जगण्याची सवय लागते. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही या खेळाडूंचा आदर्श घेऊन क्रीडा क्षेत्रात भरारी घ्यावी, हीच आमची इच्छा आहे. संस्थेच्या वतीने आम्ही खेळाडूंना नेहमीच असेच प्रोत्साहन देत राहू.”

​—  विजय पवार – (संस्थापक अध्यक्ष, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव )

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button