पिंपरी चिंचवड शहरात अत्याधुनिक सर्व सोयी सुविधायुक्त नवीन कोविड केअर सेंटर सुरु करावे- नाना काटे
![Accelerate the work of Grade Separator at Jagtap Dairy Sai Chowk - Nana Kate](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/nana-kate.jpg)
पिंपरी |
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक सर्व सोयी सुविधायुक्त नवीन कोविड केअर सेंटर सुरु करावे अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे. निवेदनात त्यांनी नमूद केले आहे कि, शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्येत लक्षणीय वाढ होत असून शहरातील रुग्णांना उपचारासाठी असलेले आपल्या महापालिकेचे वाय.सी.एम., जिजामाता, भोसरीचे कोविड हॉस्पिटल, जम्बो कोविड सेंटर, ऑटो क्लस्टर कॉविड सेंटर, या हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही. तसेच शहरातील खासगी छोटी मोठी सर्व रुग्णालय फुल झाली आहेत. सध्याच्या परिस्थित शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्यानां इच्छा असूनही वैद्यकीय सेवा देता येत नाही.
ही बाब लक्षात घेता, शहरातील काही मंगल कार्यालये व हॉटेल्स महापालिकेच्या ताब्यात घेवून एखाद्या वैद्यकीय सेवा देण्यार्या किवा सध्या महापालिकेतर्फे सुविधा देणाऱ्या संस्थेस चालविण्यास देण्याबाबत विचार करण्यात यावा, सदरबाबत यापूर्वीही आपणाकडे ही मागणी केलेली होती. तरी याचा शहरातील नागरिकांच्या हिताचा दृष्टीने गांभीर्याने विचार करण्यात यावा. तसेच शहरातील १८ मीटर पेक्षा कमी रुंदी असण्यार्या गल्लीबोळातील सिमेंट रस्त्याची कामे तात्त्पुर्त्या कालावधीसाठी थांबवून त्याच्या सर्व निधी शहरातील नागरिकासाठी नव्याने वैद्यकीय सेवा देणाऱ्या तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक व्हेन्टीलेटर, आसीयू, ऑक्सिजन सर्व सोयी सुविधायुक्त कोविड सेंटर उभारण्यात तो निधी वापरण्यात यावा.तरी आयुक्तांनी शहरातील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून परिस्थिती हाताबाहेर न जावून देता तत्काळ आपल्या अधिकारात निर्णय घेवून शहरातील नागरिकांसाठी उत्तम वैद्यकीय सेवा मिळण्याकरिता व नागरिकांच्या सोयीच्या व गरजेच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात वरील ठिकाणी सुचविल्याप्रमाणे नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात यावे अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.