breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचे युवा नेते श्याम जगताप यांच्या कार्याची पक्षश्रेष्ठींकडून दखल; युवक आघाडीच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी!

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शाम जगताप यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या हस्ते व कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी शाम जगताप यांच्या कार्याचा आढावा घेतला, शाम जगताप यांनी चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदा वर कार्यरत राहून राष्ट्रवादी पक्ष संघटना च्या वाढीसाठी कार्यक्षमपणे काम केले तसेच कोरोना काळामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले या सर्व कार्याची दखल घेऊन शाम जगताप यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पदावर त्यांची निवड करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष वैशाली काळभोर ,राष्ट्रवादी युवकचे विशाल काळभोर ,लाला चिंचवडे ,संदीप चिंचवडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नियुक्ती नंतर शाम जगताप यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button