राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पवनामाईचे पूजन
संथ वाहते पवनामाई, तहान भागवते शहराची.., पवनामाईप्रती कृतज्ञता व्यक्त
पिंपरी-चिंचवडः पिंपरी-चिंचवड शहराचे तहान भागवणारे पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर प्रतिवर्षी सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी पवना माईचे पूजन करण्यासाठी येत असतात परंतु यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना देखील निवडणूक तोंडावर असल्याने सत्ताधाऱ्यांना व प्रशासनाला पवना माईचा विसर पडल्याचे जाणवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पवनामाईची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते पवनामाईंचे पूजन करण्यासाठी पवना धरण येथे उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, श्रीमंत जगताप, दिलीप पानसरे, राजेंद्र कदम, एकलास सय्यद, हनुमंत वाबळे, नागेश सदावर्ते, गणेश काळे, सागर लष्करे, पप्पूलाल विश्वकर्मा, जिब्राईल शेख, हेमंत बलकवडे, श्रीकांत पवार, राजकुमार माने, प्रिया कांबळे, वंदना आराख, लक्ष्मीकांत गालफाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते..




