आकुर्डीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक ऍक्शन मोडवर; महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक
प्रभागातील वीज पूरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

पिंपरी – प्रभाग क्रमांक 14 आकुर्डीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक ऍक्शन मोडवर आले असून परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्येबाबत त्यांनी पहिली बैठक घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत प्रभागातील वीज पूरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
नगरसेवक प्रमोद कुटे, नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, सागर पुंडे, रोशन जगताप, हिरामण काळभोर, मधव नेर्लेकर, महावितरणच्या भोसरी विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल देवकर, उपअभियंता अशोक जाधव, कनिष्ठ अभियंता सोनाली शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते. मोहननगर, विठ्ठलवाडी , दत्तवाडी, आकुर्डी परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्यांचा कालावधी वाढविणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
जय गणेश व्हिजन, सोनिगरा क्लासिक येथील विद्युत केबल, विठ्ठलवाडी, दत्तवाडी येथील एलटी केबल, राम नर्सिंग होम ते प्रमोद कुटे यांचे निवासस्थान परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा. चिंचवड स्टेशन साई बाबा नगर , दवा बाजारला एमआयडीसीवरून होणार वीज पुरवठा बायपास करून आकुर्डी विभागतून जोडावा. डाली एंड समीर व संघवी कंपाउंड येथील ट्रांसफॉर्मर चा वॉक डाउन सर्वे करून लोड वितरीत झाला का हे तपासून घेणे.वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात.फॉल्ट झाल्यावर अधिकारी, दुरुस्ती वाहन उशिरा येते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी विलंब लागतो. त्यासाठी फॉल्ट होताच कर्मचारी यांनी घटनास्थळी हजर व्हावे. मोहननगर येथील वारंवार होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा. प्रधान मंत्री आवास योजना च्या फीडर वरुण साई मंदिर येथे रिंगमन युनिट (RMO)टाकावा. हर्षमय सोसायटी चा ट्रांसफॉर्मर कार्यांवित करावा. गाय वासरू चौकातील केबलची समस्या सोडवावी. श्रीमती लिलाबाई खिवसरा शाळेजवळील ट्रांसफॉर्मर ला सातत्याने पेट घेते त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच सर्वे नंबर १२६ ,१३५ व महात्मा फूले नगर येथील वारंवार सकाळी खंडित होणारा वीजपुरवठा व प्रभागातील ओवरहेड केबल अंडरग्राउंड कराव्यात , ट्रांसफ़ॉर्मर ला जी आय शीट लावणे.अशा विविध सूचना नगरसेवक प्रमोद कुटे ,नगरसेविका वैशाली काळभोर ,नगरसेविका अरुणा लंगोटे व गणेश लंगोटे यांनी केल्या.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येत्या महिन्याभरात ही कामे मार्गी लावली जातील. आकुर्डी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.




