ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार जोरात; खासदार लंके, आमदार शेळके यांची सभा

मिशन–PCMC : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचार

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर चिखली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार वेग घेत असून आज आयोजित ‘विजयी संकल्प सभा’ उत्साहात पार पडली. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री. विकास नामदेव साने, सौ. साधनाताई नेताजी काशिद, सौ. संगितानानी प्रभाकर ताम्हाणे आणि कु. यश दत्ताकाका साने यांच्या प्रचारार्थ जनसंवाद साधण्यात आला.

या वेळी खासदार मा. श्री. निलेशजी लंके आणि आमदार मा. श्री. शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पिंपरी-चिंचवड शहराने नेहमीच विकासाभिमुख आणि कर्तृत्वाच्या राजकारणाला साथ दिल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. सभेदरम्यान स्व. दत्ताकाका साने यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जनसंपर्काच्या आणि नेतृत्वाच्या कार्याचा गौरव करण्यात आला. चिखली परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मोठी उपस्थिती पाहता सर्व उमेदवारांना जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

हेही वाचा      :          इंद्रायणीनगर–भोसरी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपा शाश्वत विकासाचा अजेंडा! 

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार मा. श्री. अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत फळी सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दरम्यान, ‘मिशन–PCMC’ अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा घरोघरी प्रचार सुरू असून नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडण्यात येत आहे. येत्या निवडणुकीत प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सुसंस्कृत कारभारासाठी “घड्याळ” या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button