ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग क्रमांक २७ मध्ये नाना काटे यांचा ‘मास्टर स्ट्रोक’

अनिता थोपटे मैदानात; भाजपमध्ये गोंधळ, इच्छुकांची बंडखोरी

पिंपरी-चिंचवड | महापालिका निवडणूक २०२६ तोंडावर असताना प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार प्रमुख व माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी अचानक आणि आक्रमक राजकीय चाल टाकत भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे. माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नी अनिता कैलास थोपटे यांना उमेदवार म्हणून पुढे करत राष्ट्रवादीने केवळ उमेदवारी जाहीर केली नाही, तर संपूर्ण प्रभागातील सत्ता-समीकरणांनाच धक्का दिला आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना घेतलेला हा निर्णय म्हणजे राष्ट्रवादीचा थेट ‘मॅच-विनिंग मूव्ह’ असल्याचे मानले जात आहे. कारण रहाटणी–काळेवाडीच्या राजकारणात कैलास थोपटे हे नाव आजही मतदारांमध्ये विश्वासाचं आणि कामाचं प्रतिक मानले जाते. सलग दहा वर्षे प्रभागाचे नेतृत्व, रस्ते–पाणी–ड्रेनेजपासून नागरिकांच्या दारात पोहोचणारी कामे, आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ही त्यांची ओळख आजही ताजी आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या लाटेत त्यांचा निसटता पराभव झाला असला, तरी थोपटेंची पकड सुटलेली नाही, हेच या उमेदवारीतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा      :          प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची ताकद वाढली 

भाजपमध्ये उमेदवारीवरून यादवी, राष्ट्रवादीला आयते बळ

काल दिवसभरात प्रभाग २७ मध्ये घडलेल्या दोन मोठ्या घडामोडींनी भाजपची अंतर्गत फाटाफूट चव्हाट्यावर आणली. भाजपकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी नाना काटे यांची भेट घेऊन “ भाजपने पुन्हा त्याच नगरसेवकाला उमेदवारी दिली” या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांच्या समक्ष प्रतिज्ञा करत राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. या सर्व इच्छुकांनी एकमुखी राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करत भाजपला धक्का दिला, त्यामुळे प्रभागात भाजपची संघटनात्मक पकड सैल होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

महिला कार्ड + थोपटेंचा अनुभव = भाजपसाठी धोक्याची घंटा

या सगळ्या पार्श्वभूमीवर अनिता थोपटे यांची उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादीचा डबल अटॅक मानला जात आहे. एकीकडे महिला उमेदवाराच्या माध्यमातून महिला मतदारांपर्यंत थेट पोहोच, सहानुभूतीचा घटक आणि बदलाची भावना, तर दुसरीकडे कैलास थोपटे यांचा प्रदीर्घ अनुभव, मजबूत नेटवर्क आणि जमिनीवरची ताकद हा संगम भाजपसाठी घातक ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषक उघडपणे बोलू लागले आहेत.

प्रभाग २७ : भाजपची सुरक्षित जागा नाही, रणांगण बनले!

एकंदरीत, प्रभाग क्रमांक २७ आता भाजपसाठी सुरक्षित किल्ला न राहता थेट रणांगण बनला आहे. नाराज इच्छुक, संघटनातील अस्वस्थता आणि राष्ट्रवादीचा आक्रमक महिला-नेतृत्वाचा डाव यामुळे आगामी निवडणूक भाजपसाठी कठीण, तर राष्ट्रवादीसाठी निर्णायक संधी ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेला हा धाडसी डाव निवडणुकीचा निकाल बदलणार का, भाजपची रणनीती कोलमडणार का, आणि प्रभाग २७ मध्ये सत्ता कुणाच्या हाती जाणार याकडे आता संपूर्ण पिंपरी–चिंचवडचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button