ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची ताकद वाढली

अनुसूचित जातीतील इच्छुकांचा राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा एकसंघ निर्धार

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अधिक बळकट होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांनी माजी विरोधी पक्षनेते माननीय नाना काटे यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीत सखोल व सकारात्मक चर्चा झाली.

या वेळी प्रभागातील अरुण चाबुकस्वार यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवार उपस्थित होते. दीपक जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाली असून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा     :          शिवसेनेचा किल्ला ढासळला..! माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, कुणाल किसन तापकीर राष्ट्रवादीत, प्रभाग ३ मध्ये राजकीय भूकंप 

बैठकीत पक्ष जो अधिकृत निर्णय घेईल, त्या उमेदवाराला सर्व इच्छुक एकत्र येऊन संपूर्ण ताकदीने मदत करतील, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच येत्या १६ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पॅनल विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी इच्छुक उमेदवार सुमित डोळस, निखिल काळे, विवेक कांबळे, छत्रभुज झाडे, विशाल भालेराव, माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, अमित भालेराव, संदीप पिसाळ, नितीन ओव्हाळ, युवराज प्रगणे, प्रमोद चाबुकस्वार यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना काटे म्हणाले, “येणाऱ्या १६ तारखेला गुलाल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच असेल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर होऊन नवउत्साह आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची ताकद निश्चितच वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button