Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन–PCMC : महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार गटाची ‘कोअर कमिटी’ जाहीर

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्त्वात पिंपरी–चिंचवडमध्ये रणनिती

पिंपरी–चिंचवड । विशेष प्रतिनिधी 

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाने शहरातील संघटन अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण मा. खा. शरदचंद्र पवार आणि प्रदेशाध्यक्ष मा. आ. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधारित ‘कोअर कमिटी’ जाहीर करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा आदर राखत ही रचना निश्चित करण्यात आली आहे.

महापालिका निवडणूक लक्षात घेऊन सर्व पदाधिकारी–कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यासाठी ही कमिटी मार्गदर्शक भूमिका निभावणार आहे.

हेही वाचा     :        पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

जाहीर करण्यात आलेल्या कोअर कमिटीतील सदस्य

१) डॉ. अमोल कोल्हे – खासदार
२) हर्षवर्धन पाटील – प्रभारी
३) आ. रोहितदादा पवार – आमदार व प्रदेश सरचिटणीस
४) आझम पानसरे – माजी महापौर
५) प्रकाश म्हस्के – निरीक्षक
६) तुषार कामठे– जिल्हाध्यक्ष, पिंपरी चिंचवड
७) देवेंद्र तायडे – कार्याध्यक्ष
८) सुलक्षणा शिलवंत – विधानसभा उमेदवार
९) रविकांत वरपे – प्रदेश प्रवक्ता
१०) संदीप चव्हाण – प्रदेश संघटक सचिव
११) विक्रांत पाटील – प्रदेश संघटक सचिव
१२) सुनिल गव्हाणे – विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष
१३) ज्योती निंबाळकर – महिला शहर अध्यक्षा
१४) इम्रान शेख – युवक शहर अध्यक्ष
१५) काशिनाथ जगताप – शहर उपाध्यक्ष
१६) विशाल वाकडकर – युवक प्रदेश उपाध्यक्ष
१७) जयंत शिंदे – शहर सरचिटणीस

प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या पत्रानुसार, या कोअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली येथील संघटनात्मक कामकाज अधिक वेगवान व समन्वयपूर्ण होणार असून नियमित अहवाल प्रदेश कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button