महापालिका मिशन-२०२२ : भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे ‘मायक्रो प्लॅनिंग’
![Municipal Mission-2022: BJP MLA Laxman Jagtap's 'Micro Planning'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/laxman-Jagatap-Pcmc.jpg)
चिंचवड विधानसभा मतदार संघात समर्थ बूथ अभियान
बूथ प्रमुख, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
पिंपरी । अधिक दिवे
भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष तथा चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मायक्रो प्लॅनिंग’ सुरू केले आहे.
चिंचवड मतदारसंघातील चिंचवड-किवळे मंडलाच्या प्रभाग क्रमांक १८ च्या समर्थ बूथ अभियानाअंतर्गत शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख बैठकीचे चिंचवडगाव लिंक रोड येथील सॅफ्रॉन हॉटेल येथे आयोजन केले होते.
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, जिल्हा चिटणीस मोरेश्वर शेडगे महिला आघाडीच्या अध्यक्षा उज्वला गावडे, किवळे-चिंचवड मंडळाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, महिला आघाडी अध्यक्ष पल्लवी वाल्हेकर, युवा मोर्चा अध्यक्ष सनी बारणे, समर्थ बूथ अभियान चिंचवड मतदार संघाचे समन्वयक संतोष ढोरे, सहसंयोजक स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, नगरसेवक राजाभाऊ गावडे, सुरेश भोईर, मंडल व जिल्ह्यातील प्रभाग १८ मधील पदाधिकारी सर्व शक्ती केंद्रप्रमुख आणि बुथ प्रमुख उपस्थित होते.
याबाबत बोलताना भाजपा जिल्हा चिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे म्हणाले की, समर्थ बूथ अभियान संपूर्ण शहरात सुरू आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदार संघातील बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, मंडल प्रमुखांच्या प्रत्यक्ष भेटी सुरु केल्या आहेत. जगताप यांनी मतदार संघातील निवडणूक तयारीवर जातीने लक्ष घातले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चिंचवड मतदार संघात भाजपा लक्षवेधी यश संपादन करेल, असा आम्हाला विश्वास आहे.
चिंचवड मतदार संघ ठरणार ‘किंगमेकर’
पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत भोसरी, पिंपरी आणि चिंचवड अशा तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदार संघात ५२ पैकी ३६ निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, मतदार संघातील ३ अपक्ष नगसेवकांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा चिंचवड विधानसभा ‘किंगमेकर’ ठरेल, असा विश्वास आमदार जगताप समर्थकांमधून व्यक्त होत आहे.