सामाजिक कार्याबद्दल दिघी विकास मंचचा महापालिकेतर्फे गौरव
![Municipal Corporation honors Dighi Vikas Manch for social work](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/WhatsApp-.jpeg)
पिंपरी – सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उपक्रम राबवून सामान्य नागरिकांच्या हितासाठी केलेल्या कार्याबद्दल दिघी विकास मंचाचा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे गौरव करण्यात आला.महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिघी विकास मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ लबडे, सुनिल काकडे, के. के. जगताप, विकी अकुलवार, समाधान कांबळे, दत्ता घुले, अभिमन्यु दोरकर, ज्ञानेश आल्हाट, पांडूरंग म्हेत्रे आदी सभासद उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, ”दिघी विकास मंचाचे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मंचाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. सामान्य नागरिकांच्या हितासाठी मंच नेहमी कार्यरत असतो. मंचाच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते”.
उपमहापौर नानी घुले म्हणाले, ”समाजहिताचे कार्य करणाऱ्यांचा संच म्हणजेच दिघी विकास मंच अशी दिघी परिसरात मंचाची ओळख आहे. कोणत्याही सामाजिक कार्यात मंचाचे पदाधिकारी पुढे असतात. सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असतात. विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे”.