Mumbai-Pune Expressway आज दुपारी २ तासांसाठी बंद
![Mumbai-Pune Expressway closed for 2 hours today afternoon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/mumbai-pune-expressway-780x470.jpg)
पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गावर खंडाळा घाटात रविवारी रात्री दरड कोसळली. दरड कोसळल्यानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच आडोशी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली. यामुळे मुंबईकडील जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज २ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक बंद असेल.
पुण्याहून मुंबईकडे येताना चिवळे पॉइंट लागतो तिथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात येईल. याच मार्गावरुन चार चाकी, हलकी मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील. १२ ते २ यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिलेली आहे.
हेही वाचा – कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
ALERT.. authorities mention that today between 12 to 2 PM both lames will be closed for heavy traffic (cars might be allowed,we are not clear now) , hence Plan accordingly or use the old Mumbai Pune expressway.. https://t.co/j8e3iTScER
— Mumbai Pune Expressway (@Mumbai2PuneEway) July 24, 2023
दरड कोसळल्याची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, तसेच महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घाटात पडलेली दरड काढण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. दरड काढण्यासाठी जेसीबी यंत्र, डंपर मागविण्यात आले आहेत. दरड काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या तीन मार्गिकेवरील वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळविण्यात आली आहे.