ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी ते श्रीक्षेत्र भीमाशंकर पहिली कावड यात्रा उत्साहात

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सुमारे ४०० शिवभक्तांचा सहभाग

मोशी । प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच मोशी ते श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग कावड यात्रा-२०२३ उत्साहात झाली. या यात्रेमध्ये ग्रामस्थ आणि शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भीमाशंकर सोडून इतर सर्व ज्योतिर्लिंगांना कावड यात्रेची प्रथा आहे. परंतु, आजपर्यंत कोणीही भीमाशंकर येथे कावड यात्रा नेली नव्हती. मोशी, च-होली, चिखली, डुडुळगाव या परिसरातून प्रथमच पायी कावड यात्रेचे नियोजन करण्यात आले होते.

यासाठी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते, माजी महापौर नितीन काळजे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, संजय घनवट तसेच समस्त मोशी, चऱ्होली, जाधववाडी-डुडूळगाव ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हेही वाचा – Pimpri : मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा मनसेकडून जाहीर निषेध!

या यात्रेत मोशी व आजूबाजूच्या परिसरातून तब्बल ४०० शिवभक्त दाखल झाले होते. दिनांक २ सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजता डीजे च्या तालावर श्री नागेश्वर महाराज मंदिर मोशी येथून पायी कावड यात्रेला प्रारंभ झाला. शिरगाव ते भोरगिरी सुमारे १० किलोमीटर आमदार महेश लांडगे यांनी खांद्यावर कावड घेऊन कावड यात्रेत सहभागी दर्शवला. शिवभक्त आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात शिव शंभो हर हर महादेव, जय श्रीराम तसेच छत्रपती शिवाजी श्री महाराज की जय, छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, हिंदूधर्म की जय, हिंदू राष्ट्र की जय अशा घोषणांनी भोरगिरीचे घनदाट जंगल दणाणून निघाले.

इंद्रायणी- भामाचे जल भीमाशंकराला अर्पण…

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथे कावड पोहोचल्यानंतर मोशी आणि चरोली भागातून आणलेल्या कावडचे पूजन श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग चे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी- चिंचवड शहराचे माजी महापौर श्री नितीन काळजे आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, विश्वस्त मधुकर अण्णा गवांदे, दत्तात्रय कौदरे, मुख्य व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, उपसरपंच गोरक्ष कौदरे, अंकुश कौदरे, आत्माराम कौदरे तसेच इतर पुजारी वर्ग उपस्थित होते. पूजा तसेच आरती झाल्यानंतर सर्व शिवभक्तांना श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग संस्था तर्फे विशेष दर्शनाची सोय करण्यात आली होती. सर्व शिवभक्तांनी कावड मध्ये आणलेले इंद्रायणी-भामा नदीचे जल शिवलिंगावर अर्पण केले आणि यात्रेची सांगता केली. तसेच, हिंगणे सरकार नगर येथील महादेव मंदिर मोशी येथे विधीवत कावड ची मिरवणुक काढून कावड नाचविण्यात आली त्यानंतर आरती करून नागरिकांना महाप्रसाद देवून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button