मोशीतील मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू
वसतिगृहात १०० विद्यार्थ्यांची क्षमता
![Moshi, backward classes, meritorious, children, government, hostels, admissions, 100, students, ability,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/moshi-780x470.jpg)
पिंपरी : मोशी पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
वसतिगृहात इयत्ता ११ वी, १२ वी, पदविका व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व खुला प्रवर्गाच्या तसेच अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधिन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहेत.
वसतिगृहात १०० विद्यार्थ्यांची क्षमता असून विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य, दरमहा ८०० रूपये निर्वाह भत्ता, ग्रंथालय आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे.
इच्छुकांनी मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह, मोशी पिंपरी-चिंचवड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून अर्ज घेवून वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.