पिंपरी / चिंचवड
अल्पवयीन मुलीचा विनयभंग : दोघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/minor-girl.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या घरात घुसून घराची काच फोडली. ही घटना मंगळवारी (दि. 19) निगडी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
निशिकांत कांबळे, दयानंद घाडगे (दोघे रा. अजंठानगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीला हाताने मारहाण केली. ‘तू मला लय आवडतेस’ असे म्हणून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच फिर्यादीच्या घरात घुसून आरोपींनी घराची काच फोडली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.