पिंपरी / चिंचवड
माल देण्याघेण्याच्या कारणावरून महिलेचा विनयभंग; एकास अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Bhosari-News-पतीच्या-क्लिनिकमध्ये-स्वतःच्या-क्लिनिकचे-लेबल-लावण्यासाठी-गेलेल्या.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
माल देण्याघेण्याच्या व्यवहारावरून एका व्यक्तीने महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी चार वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडली.
नवनाथ शेटे (वय 35, रा. शेटेवाडी, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला माल देण्याघेण्याच्या व्यवहारावरून फिर्यादीच्या पतीला आणि फिर्यादीला हाताने मारहाण केली. त्यांना अश्लील बोलून शिवीगाळ केली. फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.