पिंपरी / चिंचवड

पादचारी तरुणाला मारहाण करून मोबाईल पळवला : तिघांना अटक

पिंपरी | प्रतिनिधी

रस्त्याने पायी चालत जाणा-या एका तरुणाला दगडाने आणि हाताने मारहाण करून जबरदस्तीने तरुणाच्या हातातून 20 हजारांचा मोबाईल फोन पळवला. ही घटना सोमवारी (दि. 11) रात्री सव्वादहा वाजता बोराडेवाडी-मोशी रस्त्यावर घडली. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे.

स्वप्नील पांडुरंग गायकवाड (वय 22), आमन कुमार सुभाषचंद्र गौतम (वय 22), दीपक माणिक हांडगे (वय 19, रा. जाधववाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजा नाजीर शेख (वय 20, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बोराडेवाडी-मोशी रस्त्याने पायी चालत जात होते. ते कुमार प्रथम सोसायटी समोर आले असता दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांना हाताने व दगडाने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर फिर्यादी यांचा 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. पोलिसांनी आरोपींना निष्पन्न करून अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button