मंदिरे उघडण्यासाठी मनसेचे घंटानाद आंदोलन
![MNS bell ringing agitation to open temples](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/mns.jpg)
पिंपरी – मंदिरे व इतर धार्मिक स्थळे उघडण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर मनसेचे वतीने आज (सोमवारी) आकुर्डीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.आकुर्डीतील खंडोबा मंदिरासमोर शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कोरोनाची तिसरी लाट येणार अशा प्रकारची वातावरण निर्मिती करण्याचा कार्यक्रम सरकार पक्षाकडून चालू आहे. देशातील बऱ्याच राज्यांमध्ये अटी-शर्तीसह इतर उद्योगांना, धार्मिक स्थळे उघडायचा निर्णय घेतला आहे. सगळ्या अटी व शर्तींचे पालन करून धार्मिक भाविक लाभ घेत आहेत. महाराष्ट्रामध्येही अटी-शर्तीसह हिंदूंचे सण साजरे करू द्यावेत, अशी मनसेची मागणी असल्याचे शहराध्यक्ष चिखले यांनी सांगितले.
महिला शहराध्यक्ष अश्विनी बांगर, रूपेश पटेकर, राहुल जाधव, विशाल मानकरी, बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे, सचिन मिरपगार, नीलेश नेटके, संतोष यादव, स्वप्निल महांगरे, प्रदीप गायकवाड, नारायण पठारे, नितिन चव्हाण, आकाश लांडगे, प्रतीक शिंदे, अलेक्सझांडर आप्पा मोझेस, गंगाधर पांचाळ, राजेश अवसरे, ऋषिकेश जाधव, विपुल काळभोर, के. के. कांबळे, गणेश वाघमारे, शंकर बिराजदार, डी. एम. कोळी, दिनकर सूर्यवंशी, सीमा बेलापुरकर, अनिता पांचाळ, विद्या कुलकर्णी, सुजाता काटे, वैशाली बोत्रे, संगीता कोळी, अरुणा मिरजकर, हेमंत डांगे, सुमित कलापुरे, विक्रम आढे, सोरटे, कृष्णा काकडे, रोहन कांबळे, सुशांत साळवी, शिवकुमार लोखंडे, नितीन सूर्यवंशी, अविनाश तरडे, कृष्णा महाजन, विशाल साळुंखे, निलेश नन्नवरे, भरत क्षेत्र, मंगेश गायकवाड, ऋषिकेश पाटील, राजू भालेराव, मिलिंद सोनवणे, शैलेश पाटील, विजया परदेशी, दत्ता घुले आदी आंदोलनात सहभागी झाले होते.