ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आजी आजोबांच्या लाडात रमली मुले!

विधायक उपक्रम: डीसके कुजंबन सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी एकत्र येत सुरू केले संस्कार वर्ग

पिंपरी : विभक्त कुटुंब पद्धती, कामानिमित्त शहरातील वास्तव्य, शहर-खेड्यातील जीवनशैलीतील अंतर यामुळे अनेक मुलांना आज्जी-आजोबाचे प्रेम व संस्काराची शिकवण लाभत नाहीत. हाच धागा पकडत डीसके कुजंबन सोसायटीमधील जेष्ठ महिला मंडळाने गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सोसायटीमधील मंदिरात विनामुल्य संस्कार-वर्ग सुरू केले. सोसायटीतील मुलांना एकत्र करत त्यांच्याशी गप्पा मारल्या, संस्कारक्षम गोष्टी शिकवल्या. मुले देखील या आजी आजोबांच्या लाडामध्ये रमून गेली आहेत.

आजच्या महागाईच्या आणि स्पर्धात्मक युगामधे दैनंदिन जीवन जगण्यासाठी खेड्याखेड्यामधुन अनेकजण मुबंई-पुणे सारख्या शहरात येतात. आय.टी., ॲटोमोबाईल सारख्या क्षेत्रात काम करून अथवा कोणतातरी व्यवसाय करून कुटुंबाच्या पालनपोषणासाठी अथक प्रयत्न करतात. आईवडील अर्थाजनासाठी सकाळी बाहेर पडतात व संध्याकाळी घरी येतात. दोघांनाही मुलांवर लक्ष द्यायला व संस्कार घडवायला वेळ नसतो.

हीच बाब हेरून डीसके कुजंबन सोसायटीमधील जेष्ठ महिला मंडळातील वैजयंती पवार, अनुपमा वाळवेकर, सुलभा गायकवाड, शुभदा जोगळेकर, वर्षा पाटणकर, रोहिणी सबाणे, अलका कदम, उज्वला जोशी, उज्वला नलावडे, सुवर्णा महाडिक, वंदना बाविस्कर, लता बाविस्कर आणि नेहा शिरसाट यांनी संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा –  ‘संजय राऊतांनी सामनातून काँग्रेसचे विचार मांडायला सुरुवात केलीय’; मंत्री योगेश कदम यांचा टोला

सोसायटीमध्ये २६ जानेवारी, १५ ॲागस्ट, होळी, गणेशोत्सव, नवरात्री, आषाढी एकादशी, पर्यावरण दिन, महिला दिन असे अनेक कार्यक्रम होतात. सर्व कार्यक्रमांमध्ये आज्जी व नातवंडांचा सहभाग अग्रणीय असतो. रामनवमीचा उत्सव आज्जी-नातवंडांनी इतर सोसायटीतील सभासदांसमवेत आनंदात साजरा केला. मुलांनी राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाची वेशभुषा धारण करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ह्या उपक्रमासाठी सोसायटी समितीचे सहकार्य लाभले तसेच सोसायटी समितीने आज्जी-आजोबांना विरंगुळा म्हणुन रामनवमीच्या मुहुर्तावर सोसायटीमध्ये वाचनालयाची सुरूवात केली.

विस्मरणात गेलेल्या गोष्टींना उजाळा

गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर सोसायटीमधील मंदिरातचं विनामुल्य संस्कार-वर्ग सुरू केले. सोसायटीमधील सर्व मुले ही आपलीच नातवंड आहेत ह्यानात्याने त्यांना रामरक्षा स्तोत्र शिकवणे, छान छान गोष्टी सांगुन मुल्यशिक्षणाचे धडे देणे, दररोज देवासमोर दिवा लावून शुभं करोति म्हणणे असा उपक्रम सुरू केला. नातवंडांना संस्कारवर्गाची गोडी लागावी म्हणुन दररोज वेगवेगळा व पौष्टिक प्रसाद सुद्धा ह्या प्रेमळ आज्ज्या दररोज आणतात.

खरंतरं आपल्या हिंदुधर्मामध्ये ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हटले आहेच पण ते प्रत्यक्षात आचरणात कसे आणायचे ह्याचा आदर्श डीसके कुंजबन जेष्ठ महिला मंडळाने व सोसायटीमधील बालकांनी ठेवला. डीसके कुंजबन सोसायटीमधील प्रत्येक आज्जीला सर्व मुले ही माझीच नातवंडे आहेत असे वाटते व मुलं पण आज्जीच्या प्रेमाचा आदर राखतात. मुलांचा वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा, उत्साह, परस्पर सहकार्य हे पाहुन आज्जीवर्गाला हुरूप येतो व जीवनाच्या परतीच्या मार्गांवर आपण सत्कार्य करतो ह्याचा परमानंद होतो.

वैजयंती पवार

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button