पिंपरी / चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांनी घेतली परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्र्यांची भेट

युक्रेनमध्ये अडकलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील विद्यार्थ्यांच्या सुटकेबाबत चर्चा

पिंपरी l प्रतिनिधी

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांची भेट घेतली. युक्रेनमध्ये अडकलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुटकेबाबत यावेळी चर्चा झाली.

मंत्री व्ही मुरलीधरन यांनी आज (बुधवारी, दि. 2) पुणे दौरा केला. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांची भेट घेतली.

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. युक्रेन देशात भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गेले आहेत. युद्धादरम्यान या विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ सुरु केले आहे. त्यानुसार काही विद्यार्थ्यांना भारतात आणले गेले. मात्र अजूनही युक्रेनमध्ये काही विद्यार्थी अडकून पडले आहेत. दरम्यान कर्नाटक येथील एका विद्यार्थ्यांचा युक्रेनमध्ये रशियाच्या हल्यात मृत्यू झाला.

या संपूर्ण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत, त्यांची तिथून लवकरात लवकर सुटका करावी, अशी विनंती आमदार जगताप यांनी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्र्यांकडे केली आहे. यावेळी पुणे जिल्हा भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, माजी नगरसेवक तथा निवडणूक प्रमुख चिंचवड विधानसभा शंकर जगताप आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button