मिशन विधानसभा निवडणूक : आमदार महेश लांडगे यांच्या विजयासाठी थेट श्री केदारनाथ चरणी साकडे!
पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संतोष बारणे यांच्या वतीने श्री क्षेत्र केदारनाथ येथे प्रार्थना

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या विधानसभेच्या निवडणुकीतील विजयासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांनी थेट केदारनाथ चरणी साकडे घालत, श्री केदारनाथांचे दर्शन घेतले आहे. श्री केदारनाथाचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या प्रचाराची सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. यावेळी संतोष बारणे यांच्यासह जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज शशिकांत महाराज मोरे, वरिष्ठ मुलाखतकार भाऊसाहेब कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड व सहकारी उपस्थित होते..

मोशीतील उद्योजक संतोष बारणे हे एक प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक असून सिल्वर ग्रुपचे ते संचालक आहेत त्याचबरोबर कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे ते अध्यक्ष असून विविध सामाजिक कार्यात ते अग्रणी भूमिका बजावतात. आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा तसेच समाविष्ट गावांचा प्रचंड विकास केला असून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राबविले आहेत शिवाय वर्षनुवर्षे प्रलंबित असणारे आंद्रा भामा पाणीपुरवठा, शास्तिकर सरसकट माफी साडेबारा टक्के परतावा, प्राधिकरण बाधित मिळकती फ्री होल्ड करण्याचा निर्णय असे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.. त्यामुळे भोसरी विधानसभेतील विकासाच्या पाठीशी ठाम उभी राहील असा विश्वास संतोष बारणे यांनी महाईन्यूज शी बोलताना व्यक्त केला.
हेही वाचा – ‘राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचितचे कार्यकर्ते करतील’; सुजात आंबेडकरांची टीका

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहिर झाला असून सर्वत्र प्रचाराला आता सुरवात झाली आहे, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनीही भोसरी परिसरात आपुलकीच्या गाठी भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचार दौऱ्यांना भोसरी मतदारसंघात जनतेकडून मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचार सभांमध्ये स्थानिक नागरिकांची व समर्थकांची मोठी उपस्थिती असून, लांडगे यांच्यावरचा जनतेचा विश्वास आणि प्रेम प्रचार दौऱ्यातून दिसून येत आहे. भोसरी मतदारसंघात गेल्या दहा वर्षात केलेली विविध विकासकामे तसेच सोडविले विविध प्रलंबित प्रश्न घेऊन आमदार महेश लांडगे मतदारांकडे पुन्हा एकदा जनसेवेच्या संधी देण्याचे आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.





