Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या वतीने चिपळूणला मदत रवाना; नगरसेविका निर्मलाताई कुटे यांचा पुढाकार

  • भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांचे सहकार्य

पिंपरी – चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा युवामोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या सहकार्याने रविवार (दि.२५) रोजी पिंपळे सौदागर मधील नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली आहे.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि डोंगराळ भागात दरड कोसळुन चिपळूणमध्ये आस्मानी संकट कोसळले आहे. अनेक बांधवांनी या मध्ये आपला जीव गमावला आहे. अद्यापही अनेक लोक संकटात असून अन्न-पाण्यावाचून हे जीव हतबल बसलेले आहेत. २० ते २५ हजार नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या सर्वांना सावरण्यासाठी सर्वांनी मदतीचे हात होण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांच्या पुढाकाराने तसेच भाजपा युवामोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या सहकार्याने पिंपळे सौदागर मधील नागरीकांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये जिवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली आहे.

सदर मदत मध्यरात्री १ वाजता सुखरूपपणे चिपळूण येथील गरदे इंग्लिश मिडीयम स्कुल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राबवण्यात आलेल्या रेस्क्यु कॅंपवर पोहचली आहे.या बहुमूल्य मदतीचा अनेक गरजुंना लाभ होणार आहे. एक जबाबदार नागरिक म्हणुन पिंपळे सौदागरमधील नागरिकांनी मदतीचा हात पुढे केल्याबद्दल नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांनी सर्वांचे आभार मानलेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button