मिशन-PCMC: प्रभाग १२ मधील मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट!
शांतराम बापू भालेकर यांची माहिती : भाजपाच्या सक्रियतेने नागरिकांचा मतदान हक्क सुरक्षित
पिंपरी-चिंचवड: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ (त्रिवेणीनगर, तळवडे) मधील मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यात भारतीय जनता पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी अनेक मतदारांची नावे चुकीने प्रभाग क्रमांक १ आणि ११ मध्ये स्थलांतरित झाल्याचे आढळले होते.
भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देत, स्थलांतरित मतदारांची नावे पुन्हा प्रभाग क्रमांक १२ मध्ये समाविष्ट करण्यासाठी मोठी मोहीम राबवली. या मोहिमेत शांताराम बाप्पू भालेकर, शितल धनंजय वर्णेकर आणि अस्मिता अनिल भालेकर यांचा प्रमुख सहभाग होता. कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन हरकती फॉर्म भरून घेतले तसेच विविध ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन केले.
भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने ही बाब निवडणूक आयोग आणि प्रभाग कार्यालयाचे प्रमुख अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे थेट मांडली. मतदारांच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी नेमलेल्या बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) आणि प्रतिनिधींना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली. या प्रयत्नांमुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि अखेर स्थलांतरित झालेली सर्व नावे पुन्हा प्रभाग क्रमांक १२ मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. मतदार आता त्यांच्या मूळ प्रभागात मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. भाजपच्या या सक्रिय सहभागामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि कौतुक व्यक्त केले जात आहे.
“मुलभूत मतदान हक्क सुरक्षित ठेवणे हे आमचे प्राथमिक कर्तव्य आहे. प्रभाग १२ मधील मतदारांच्या स्थलांतरित नावांचा मुद्दा त्वरित हाताळून, त्यांना त्यांच्या मूळ प्रभागात मतदानाचा अधिकार मिळवून देणे हे आमच्या पाठपुराव्याचे मुख्य उद्दिष्ट होते.”
– शांताराम बापू भालेकर, मा. नगरसेवक.



