breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मेट्रो नामकरण लढा : पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेसाठी भाजपा युवा मोर्चा आक्रमक

  •  महामेट्रोचे नाव ‘पिंपरी-चिंचवड, पुणे महामेट्रो’ करण्याची मागणी
  • पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. मोरवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रो धावणार आहे. शहरात मेट्रो असताना केवळ पुणे मेट्रो असे संबोधन वापरले जात आहे. हा पिंपरी-चिंचवडमधील शहरवासीयांचा अपमान आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचे नाव आता ‘‘पिंपरी-चिंचवड, पुणे मेट्रो’’ असे करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपा युवा मोर्चातर्फे आंदोलन आले. या वेळी मेट्रोवर पिंपरी-चिंचवड, पुणे मेट्रो असे नामकरण असलेले स्टिकर लावण्यात आले.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुषार हिंगे, युवा मोर्चा सरचिटणीस जवाहर ढोरे, दिनेश यादव, तेजस्विनी कदम, गणेश जवळकर, उपाध्यक्ष प्रसाद कस्पटे, अतुल बोराटे, सन्नी बारणे, सुमीत घाटे आदी उपस्थित होते.

माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप व विद्यमान शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.या वेळी संकेत चौंधे म्हणाले की, मेट्रोच्या खांबावर “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे स्टिकर चिटकवण्यात आले. तुम्ही नाव बदल करण्यात चालढकल करत असाल तर आम्हाला कळवा आम्ही ते बदलवून घेऊ. पण शहरावर अन्याय खपवून घेणार नाही. कोणत्याही माध्यमातून नेहमी शहराला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. हा होणारा अन्याय पुढे सहन केला जाणार नाही. अन्याय सहन करायला देखील मर्यादा असतात. आता या मर्यादा तोडुन आपल्या शहरातील युवक पेटून उठलेला आहे. यापुढे अन्यायाविरुद्ध लढा उभारणार आहे.

प्राधिकरणाचे पीसीएनटीडीए मध्ये विलनीकरण सुद्धा अशाच अन्यायकारक पद्धतीने करण्यात आले. शहरातील भूमिपुत्रांच्या मोकळ्या जमिनी, भूखंड सगळे पीसीएनटीडीए मध्ये ओढुन नेले. अतिक्रमित, विकसित झालेले भुखंड आमच्या माथी मारले. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय झाल्याची भावना आहेत.

आपले अस्तित्व अन् अस्मितेची लढाई
पुणे मेट्रोमध्ये आपल्या शहराचा मोलाचा वाटा असुन सुद्धा जर आपल्या शहराला डावलले जात असेल व शहाराच्या अस्मितेवरच घाला घातला जात आहे. असे सारख होत असेल तर हा अन्याय शहराचे जागरूक नागरिक म्हणून सहन करणार नाहीच, असे संकेत चोंधे म्हणाले आहेत. आपले अस्तित्व व अस्मितेची लढाई मजबुत करून पिंपरी चिंचवड शहराच्या विरोधकांना मैदानात उतरून आव्हान देणे गरजेचे आहे. आपण एकीने आपले हक्क मिळवून घेऊ. ही तर सुरुवात आहे. जर त्वरित निर्णय घेऊन “पिंपरी चिंचवड पुणे मेट्रो” असे नाव करण्यात आले नाही. तर हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा संकेत चौंधे यांनी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button