चिंचवड येथे गणित दिवस उत्साहात साजरा
![Math Day celebrated in Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/IMG-20211223-WA0007-e1640243173823.jpg)
पिंपरी चिंचवड | चिंचवड स्टेशन येथील विकास शिक्षण मंडळाचे श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणितज्ञ रामानुजन व भास्कराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव, सचिव संजय जाधव व विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.गणितातील अनेक भौमितिक सिद्धांत, समीकरणे असतात, बीजगणितीय सूत्रे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समजावून शिकवावी लागतात तसेच विज्ञानाचे प्रयोग व गणितीय संकल्पना त्याचे महत्त्व व गणित तत्वाची माहिती विद्यालयाचे गणित तज्ञ शिक्षक श्री बाळाराम पाटील ,रमेश ढवळे, शब्बीर मोमीन , श्यामकांत ब्राह्मणकर व संजय कोरके यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
याप्रसंगी माध्यमिक मुख्याध्यापक श्री बाळाराम पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक श्री साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव उपमुख्याध्यापक श्री बाळू महाजन, किसन आहिरे, लीला मुटकुळे ,व शरद पटेल आदी शिक्षक उपस्थित होते.