Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ५ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान

दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ५ एप्रिल रोजी पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. एकूण ५५ मान्यवरांना हे सन्मान प्रदान केले गेले ज्यात महाराष्ट्रातील ५ मान्यवरांचा समावेश आहे.

प्रा. दिपक धर यांना ‘पद्म भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अन्य चार मान्यवरांना पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. प्रा. धर सांख्यिकीय भौतिकशास्त्रावरील संशोधनासाठी प्रख्यात आहेत.

सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी गजानन माने, लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी परशुराम खुणे, कला क्षेत्रातील योगदानासाठी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन तसेच संगीत ‘कंडक्टर’ कुमी वाडीया यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. कोरल संगीत कंजक्ट करणाऱ्या त्या प्रथम भारतीय महिला आहेत. त्यांनी आजवर देश विदेशात अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button