मास्टर माईंड ग्लोबल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे यश
शिक्षण विश्व : दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या यशामध्ये मानाचा तुरा

पिंपरी चिंचवड : विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. बारावी पाठोपाठ दहावी बोर्ड परीक्षेतही मास्टर माईंड ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
सी.बी.एस.सी बोर्ड परीक्षा २०२४- २५ मध्ये १००% निकाल मिळवल्याबद्दल इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मास्टर माईंड स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
बारावी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे – विहान मिश्रा :-९६.२ %, शमन राय :- ९६% ,श्रावणी जाधव :- ९५.६ % तसेच ३३ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले.
हेही वाचा – प्रियदर्शनी शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल
१०वी गुणवंत विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे
उज्वल विश्वकर्मा- ९७.४%,
तेजस परमार – ९७.४%,
अनिरुद्ध पुरी- ९३.८%,
श्रेयस दांगट – ९३.४ % तसेच ३४ विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवले.
सी.बी.एस.सी बोर्ड परीक्षेत परिश्रमाची कास धरून उत्तुंग यश गाठण्यासाठी सदैव मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे डॉ. प्रदीपा नायर यांनी अभिनंदन केल.