पिंपरी / चिंचवड
निगडी प्राधिकरण येथे 80 वर्षीय वृद्ध महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/251002-chain-snaching.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
किराणा दुकानातून दूध घेऊन घरी निघालेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हीसकावले. ही घटना बुधवारी (दि. 27) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथे घडली.
लक्ष्मीबाई राजाराम सुर्वे (वय 80, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीबाई सुर्वे सुवर्णयुग मित्र मंडळ चौकातील किराणा दुकानातून दूध घेऊन घरी परत जात होत्या. त्यावेळी समोरून आलेल्या एका दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.