चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?
नाना काटे यांच्या प्रचाराला ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे मैदानात
चिंचवड : चिंचवड विधानसभेची जागा महाविकास आघाडी कडून कोणाला सुटणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नाना काटे यांच्या प्रचाराकरिता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
संजोग वाघेरे पाटील हे नाना काटे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरल्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळ रंगू लागली आहे. परंतु चिंचवडची जागा महाविकास आघाडीतून शरद पवार गटाला सुटली की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली याबाबत अद्यापही निर्णय झाला नसला तरी नाना काटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा – To The Point : गंगोत्री पार्क- दिघी रोडच्या मुद्यावर अजित गव्हाणे यांचा ‘सेल्फ गोल’
नाना काटे यांनी ही निवडणूक लढणार असे मनसुबे त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र त्यांना पहिला पर्याय हा महाविकास आघाडीचा राहील असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सध्या काटे हे चिंचवड विधानसभा मतदारसंघ पूर्ण पिंजून टाकत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांनी थेट नाना काटे यांच्यासोबत प्रचारात उतरल्यामुळे ही जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटली असल्याचे बोलले जात आहे.
आता नेमकी ही जागा महाविकास आघाडी कडून कोणाला सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान अजित पवार गटातून भाऊसाहेब भोईर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. तर माजी नगरसेवक मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे यांनी थेट ही जागा न सुटल्यास आम्ही बंड पुकारू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे नेमकी ही जागा कोणाला सुटणार? आणि तू जर कोण असणार? त्यावरच पुढील महाविकास आघडीचे भवितव्य अवलंबून असून सर्वांची उत्सुकता शिगेला लागली आहे.