breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Lockdown : पिंपरी-चिंचवडमध्ये काय सुरु राहणार आणि काय नाही

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

केंद्र व राज्यशासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज निर्गमित केले असून त्याची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून करण्यात येणार आहे.

कोविड – १९ या आजारास जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक महामारी (Pandemic) घोषीत केले आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये साथरोग अधिनियम,१८९७ ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि. ०१ जून २०२० पासुन दिनांक ३० जून २०२० पर्यंत वाढविण्या बाबत आदेशीत केले आहे. तसेच लॉकडाउन कालावधीत कोवीड-१९ या आजाराच्या प्रसारास प्रतिबंधीत करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राचा समावेश नॉन रेड झोन ( ऑरेज व ग्रीन झोन) मध्ये समावेश करणेत आलेला आहे.

सदर अधिनियमांतर्गत राज्यात कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र कोविड -१९ उपाययोजना नियम – २०२० अंमलात आलेले आहेत.महाराष्ट्र कोविड-१९ उपायोजना नियम २०२० अन्वये कोविड -१९ च्या प्रसारास पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आयुक्त, पिंपरी चिंचवड महानरपालिका यांना प्राधिकृत केलेले आहे. साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये कोवीड-१९ च्या प्रसारास प्रतिबंधित करण्यासाठी खालीलप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले आहेत .

१) संपुर्णत: प्रतिबंधीत करणेत येत असलेल्या बाबी –
➢ केंद्रिय गृह मंत्रालयाच्या परवानगी शिवाय इतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानप्रवास
➢ विशेष आदेशाद्वारे परवानगी प्राप्त प्रवासाव्यतीरिक्त सर्व देशांतर्गत विमान व रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक
➢ मेट्रो रेल प्रवास
➢ शाळा, कॉलेज , शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस,
➢ हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर आदरातिथ्य सेवा ( वैद्यकिय, पोलीस, सरकारी कार्यालये, बस डेपो, रेल्वे स्टेशन, विमानतळ , अलगीकरण केंद्र याठिकाणीचे उपहारगृह चालू राहतील)
➢ सिनेमा हॉल , शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार , सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि तत्सम जागा
➢ सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय, क्रीडा , मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम
➢ सर्व धार्मिक स्थळे , सर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील.
➢ सर्व केश कर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स ( या कार्यालयाचे समविषयीचे आदेश क्रं. आमुका/८/कावि/१९२/२०२० दि. २३/५/२०२० या द्वारे निरस्त करणेत येत आहेत.)

२) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या हालचाली अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री ९.०० ते सकाळी ५.०० या कालावधीत प्रतिबंधीत करण्यात येत आहेत

३) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्त दाब, दमा, यकृत व मुत्रपिंडाचे आजार, कर्करोग, HIV बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष १० पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.

४) प्रतिबंधित क्षेत्र ( कंटेनमेंट झोन ) – या कार्यालयाकडून वेळोवेळी घोषीत करणेत आलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये वैद्यकिय सेवा, अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक वस्तू पुरवठयाची साखळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक वाहतुक वगळता प्रतिबंधीत क्षेत्रामधून नागरिकांना येणे-जाणे करणेसाठी प्रतिबंध असेल. प्रतिबंधीत क्षेत्र ( कटेंनमेंट झोन ) विषयक महानगरपालिकेने वेळोवेळी निर्गत केलेल्या आदेशातील सर्व सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

५) सर्व आस्थापना प्रमुखांनी त्यांचे अधिनस्त कार्यरत कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आरोग्य सेतू अँप आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्मार्ट सारथी अँप डाऊनलोड केल्याची खात्री करुन घ्यावी. आरोग्य सेतू अँप च्या माध्यमातून रोगाची संभाव्य लागण विषयी सूचना प्राप्त होत असल्यामुळे व्यक्तीस स्वसंरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. स्मार्ट सारथी अँप मध्ये कोव्हीड-१९ बाबत विविध मार्गदर्शक सूचना, आपल्या आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या औषधाची दुकाने, महानगरपालिकेचे कोव्हीड-१९ फ्लू क्लिनिक या सोयीसुविधांची माहिती प्राप्त होते.

६) सर्व वैद्यकिय व्यावसायिक , परिचारीका,पॅरामेडीकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अँबुलन्स यांना शहर, राज्य अंतर्गत आणि अंतरराज्य वाहतुकीसाठी परवानगी राहील.

७) सर्व प्रकारचे मालवाहतुकीचे ट्रक ( रिकाम्या ट्रक सह) यांना वाहतुकीसाठी परवानगी राहील.

८) आंतरजिल्हा व आंतरराज्य प्रवासी वाहतूक पुर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. अडकून पडलेले मजूर , प्रवासी कामगार, धार्मिक यात्रेकरु, प्रवासी यांची वाहतूक यापुर्वी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाद्वारे निर्गमित मार्गदर्शक कार्यप्रणाली नुसार अनुज्ञेय राहील.

९) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात या आदेशामध्ये संपुर्णत: प्रतिबंधीत केलेल्या बाबी, विशेष आदेशाव्दारे प्रतिबंधीत केलेल्या बाबी वगळता इतर सर्व उपक्रम चालू ठेवण्यासाठी खालील अटीं व शर्तींच्या अधिन राहून परवानगी देणेत येत आहे.

अ) परवानगी देणेत आलेल्या उपक्रमांना सुरु करणेसाठी शासकिय कार्यालयाकडून स्वतंत्रपणे परवानगी घेणेची आवश्यकता नाही.

ब) क्रीडा संकुले, स्टेडियम यांचे बाह्य भाग व खुली सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली राहतील. तथापि अशा ठिकाणी फक्त वैयक्तिकरित्या करावयाचे व्यायाम प्रकार, एकट्याने खेळावयाचे खेळ उदा. सायकल, जॉगींग, धावणे, चालणे, योगासने, दोरीवरच्या उड्या इत्यादींना मुभा राहील. प्रेक्षक व सामुहिक उपक्रम, सांघिक खेळ, खेळाचे साहित्य एका पेक्षा जास्त खेळाडूंनी हाताळावयाची शक्यता असलेले सर्व खेळ उदा. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो-खो, हॉकी इत्यादी यांना परवानगी असणार नाही. अशा ठिकाणी सामाजिक / शारिरीक अंतर ठेवणे बंधनकारक असेल. सदर परवानगी सकाळी ५.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत असेल. इनडोअर स्टेडियम किंवा स्टेडियमच्या आतील परिसरात कोणत्याही उपक्रम / कार्यक्रम / खेळ यांना परवानगी असणार नाही.

क) सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूक खालील प्रमाणे सुरु करता येईल.
➢ दुचाकी – चालक
➢ तीन चाकी – चालक + दोन व्यक्ती
➢ चारचाकी – चालक + दोन व्यक्ती

ड) पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीमध्ये प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रात पि एम पि एम एल च्या बस ५०% एवढ्या क्षमतेने प्रवाशांची वाहतुक करता येईल. तसेच प्रवासा दरम्यान प्रवाशांनी शारीरिक अंतराचे व स्वच्छतेच्या नियमांचे पालन बंधनकारक असेल. आंतरजिल्हा बससेवेस परवानगी नसेल.

इ) सर्व बाजारपेठातील दुकाने सकाळी ९ .०० ते सायंकाळी ५.०० या दरम्यान सुरु राहतील. तथापि सदर ठिकाणी गर्दी होऊन सामाजिक / शारिरीक अंतर राखण्याचा निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा / दुकाने तात्काळ बंद करणेत येतील.
तसेच मटण व चिकन विक्रीची दुकाने यापूर्वी जाहीर केलेल्या तीन दिवसांऐवजी दररोज सकाळी९ ते ५या वेळेत सुरू राहतील.
फ) १) पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील सर्व औद्योगिक आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहणेसाठी सर्व रेड झोन क्षेत्रांमधून येण्यासाठी महानगरपालिकेकडून पुर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. उर्वरित भागातील प्रतिबंधीत क्षेत्र ( कन्टेंनमेट झोन) वगळता सर्व नागरिकांना पुर्व परवानगीशिवाय कामावर उपस्थित राहता येईल. २) औद्योगिक आस्थापना १०० टक्के कामगार क्षमतेसह सुरु ठेवता येतील. तथापि सर्व खाजगी कार्यालये व माहिती तंत्रज्ञान विषयक आस्थापना जास्तीत जास्त ५० टक्के मनुष्यबळासह सुरु करता येतील व उर्वरित मनुष्यबळाव्दारे शक्य असेल तोपर्यंत घरातून कामकाज (Work from Home) करणेस प्राधान्य द्यावे.

ग) बाजारपेठा मधील दुकाने ही सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळात सुरु
राहतील .तथापि त्यासाठी पी१- पी-२ तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम
तारखेस उघडी राहतील व दुस-या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. त्यामुळे
अटी व शर्तीमुळे बाजारपेठामध्ये गर्दी टाळणे शक्य होईल व पर्यायाने कोविड- १९ चा
वेगाने होऊ शकणा-या प्रसारास प्रतिबंध घालता येईल. तथापि , निकषांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बाजारपेठा / दुकाने तात्काळ बंद करणेत येतील.

ह) १) चिंचवड स्टेशन २) पिंपरी कॅम्प , साई चौक, शगुन चौक ३) गांधी पेठ चाफेकर चौक चिंचवड ४) काळेवाडी मेनरोड ( एम एम स्कुल ते काळेवाडी नदीवरील पुल) ५) अजमेरा पिंपरी ६) मोशी चौक, मोशी आळंदीरोड ७) महाराणा प्रताप चौक, निगडी बसस्टॉप ८) डांगे चौक ते काळेवाडी फाटा ९) भोसरी आळंदीरोड १०) कावेरीनगर मार्केट ११) कस्तुरी मार्केट, थरमॅक्स चौक ते साने चौक १२) दिघी जकात नाका ते मॅगझीन चौक साईबाबा मंदिर या विनिर्दिष्ठ बाजारपेठामधील दुकाने ही सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सुरु राहतील .तथापि, त्यासाठी पी१, पी२ तत्वानुसार रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सम तारखेस उघडी राहतील व दुस-या बाजुची दुकाने विषम तारखेस उघडी राहतील. सदर बाजारपेठामध्ये ज्या बाजुची दुकाने सुरु असतील त्याच्या विरुध्द बाजुस वाहनांचे पार्किंग करणेत यावे जेणेकरुन सुरु असलेल्या दुकानां समोरील जागा शारिरीक / सामाजिक अंतराच्या निकषासह ग्राहकांना वापरता येईल. विनिर्दिष्ठ बाजारपेठा वगळता शहराच्या उर्वरित भागातील दुकाने सर्व दिवस सकाळी ९.०० ते ५.०० या वेळेत सुरु राहतील. दुकाने सुरु करणेसाठी पुर्वपरवानगीची आवश्यकता राहणार नाही.

१०) कोवीड -१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाव्दारे निर्गमित करणेत आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील. ​ सदर आदेश लॉकडाउन ५.० मध्ये दि. ०१/०६/२०२० पासून पुढील आदेश होई पर्यंत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button