पिंपरीतील आचार्य अत्रे नाट्यगृहात “राष्ट्रवादी परिवार संवाद” चे थेट प्रक्षेपण
![Live broadcast of "Nationalist Family Dialogue" at Acharya Atre Natyagriha in Pimpri](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/d6b58e1e-c461-4e30-894c-3d75b7b20537.jpg)
- पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
पिंपरी । प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आणि ‘‘परिवार संवाद’’ कार्यक्रमाचे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात नियोजबद्घ आयोजन करण्यात आले.
पक्षाचे पिंपरी- चिंचवड प्रवक्ता फझल शेख आणि नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या पुढाकाराने पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात रविवारी थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, आमदार अण्णा बनसोडे , आझम पानसरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेविका माई काटे, निकिता कदम, नगरसेवक राजू बनसोडे, निलेश पांढरकर, उषा वाघेरे, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, स्मिता कुलकर्णी, मुक्ता पडवळ, बबनराव गाढवे, ज्ञानेश्वर कांबळे, शेखर काटे, विशाल काळभोर, अक्षय माच्छरे, शेखर काटे, अबेदा शेख, कविता खराडे, आशा शिंदे, अशोक भडकुंबे, शाम घोडके, सुधीर बनसोडे, गणेश काळे, सौरभ ढेरे, प्रतिक जम, दीपा मुरकुटे, रवींद्र इंगवले, निलेश निकाळजे, शादाब खान, दिनेश पटेल, रमनदीप कोल्हे, शकुंतला भट, फेमिदा शेख, इक्लीयास सय्यद, शक्रुल्हा पठान, तुकाराम बाजबालकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.