कै. किरण सुदाम काळभोर यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त २०० अंध बांधवांना छत्री वाटप
निगडी येथे विविध सामाजिक उपक्रम; यशवंतराव चव्हाण रुग्णालयात फळवाटपाचाही उपक्रम संपन्न
पिंपरी-चिंचवड : कै. किरण सुदाम काळभोर यांच्या ११व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. निगडी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिर परिसरात २०० अंध बांधवांना छत्री वाटप करण्यात आले. सचिन काळभोर मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात गरजूंना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभार्थींसाठी चहा-नाश्त्याची विशेष व्यवस्था देखील करण्यात आली होती. याशिवाय, यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून पुण्यस्मरणदिनाचे औचित्य साधण्यात आले.
हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बेरोजगारांसाठी “भव्य नोकरी महोत्सव”
या उपक्रमात सचिन काळभोर (चिटणीस, भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर) यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रोहिदास शिवणेकर (अध्यक्ष, खंडोबा व्यापारी संघटना, निगडी), राजेंद्र लक्ष्मण काळभोर, अक्षय सावंत, अक्षय जाधव, रफिक शेख, रवींद्र सवणे, अनिकेत काळभोर, अखिलेश सिंह, पप्पू हतागळे, सागर मोरे, गौरव रोधाळे, योगेश भोंडे, आझम खान, अक्रमभाई शेख, राहुल येवले, गणेश बाफना, पप्पू लूकर व विकास सुभेदार यांनी विशेष सहकार्य केले.
या उपक्रमांमधून कै. किरण सुदाम काळभोर यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा पुन्हा एकदा जनमानसात पोहोचली असून, त्यांच्या स्मृतीस सामाजिक कार्याच्या माध्यमातून सन्मानपूर्वक आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.




