माणगावात लेबर कॅम्प बॉसला 17 जणांकडून मारहाण : 14 जणांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/GANG-ARREST-PCMC.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
सुपरवायझर सोबत किरकोळ वाद झाल्याने लेबर कॅम्प बॉस त्यास समजावत असताना 17 जणांनी मिळून लेबर कॅम्प बॉसला लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने आणि दगडाने मारहाण केली. पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 7) मध्यरात्री साडेबारा वाजता शापूर्जी लेबर कॅम्प, माणगाव येथे घडली.
रमीम नसीर अख्तर (वय 21), सलीम ताजीबूल हक (वय 27), वसीम रहमान म. नूरजमाल (वय 20), राहुल मजम्मिल हक (वय 18), म. इस्माईल नुजुरउल शहाजमाल (वय 18), अब्दुल अबुसमा राकीम (वय 18), मोमीन उल इस्लाम (वय 27), म राहुल सेंटआलम (वय 18), म माजर उल हक मकबूल हुसेन (वय 19), जेहरुद्दीन रसगुल (वय 20), अब्बास उद्दीम ताजीब उल हक (वय 20), म इस्माईल शहाजमाल (वय 18), अजद अनकुलम (वय 20), अताउल रहमान म नूरजमाल (वय 21, सर्व रा. शापूर्जी लेबर कॅम्प, माणगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह दोन ते तीन तोंडओळखीच्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर उमेशराव साबळे (वय 29, रा. शापूर्जी लेबर कॅम्प, माणगाव. मूळ रा. अमरावती) असे जखमी लेबर कॅम्प बॉसचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 7) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शापूर्जी लेबर कॅम्प येथे लेबर कॅम्प बॉस म्हणून नोकरी करतात. तेथील सुपरवायझर सोबत किरकोळ वाद झाल्याने फिर्यादी त्याला समजावत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. त्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. दरम्यान फिर्यादी यांची सोन्याची चेन गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव येलमार तपास करीत आहेत.