ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कृष्णानगर : शरदनगर भुयारी मार्गावर चारचाकी वाहन बंदीची मागणी

सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव यांची आग्रही विनंती

पिंपरी-चिंचवड : कृष्णा नगर प्रभागातील शरदनगर स्पाईन रोड परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दीर्घकाळ थांबलेला नाही. या समस्येच्या निराकरणासाठी स्थापत्य विभागाने कोट्यावधी रुपये खर्चून स्वामी विवेकानंद भुयारी मार्गाचा ग्रेड सेपरेटर बांधला. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या भुयारी मार्गावर वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत असल्याने नागरिक व प्रशासनाची चिंता वाढली आहे.

भुयारी मार्गाच्या बांधकामात तांत्रिक त्रुटी असल्याच्या चर्चाही शहरात जोरदार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या सौ. कीर्ती मारुती जाधव यांनी शरदनगर, घरकुल, कोयनानगर, महात्मा फुले नगर, शिवाजी पार्क अशा परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि वाढत्या अपघातांचा विचार करता, स्वामी विवेकानंद भुयारी मार्गावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करावा अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचबरोबर, दुचाकी वाहनांसाठी वेगळ्या मार्गांवर वॉर्डन ठेवून सुकर उपाययोजना करण्यासाठीही आग्रह करण्यात आला आहे. ही मागणी लोकशाहीर जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

हेही वाचा :  देवकर प्लाझा फसवणूक प्रकरण : ५४.५० लाख रुपयांची फसवणूक

यावेळी अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती जाधव, दत्तात्रय धरमे, अभी जाधव, विशाल गरड, रोहित गरड, कुणाल पळसकर, सेफ खान, अक्षय ओहोळ, तेजस कडलक आणि घरकुल-शरदनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते. पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना करून शरदनगर परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा नागरिकांचा आग्रह आहे.

शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांचा वेध घेत, आम्ही शरदनगर भुयारी मार्गावर चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्याची विनंती केली आहे. ज्यामुळे सुरक्षित आणि सुगम प्रवासासाठी नागरिकांना मदत होईल. बदलासाठी आवाज उठवणं हाच खरा सामाजिक कर्तव्य आहे.”
– कीर्ती मारुती जाधव, सामाजिक कार्यकर्त्या.,

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button