पूर्ववैमनस्यातून तरुणाचे अपहरण करून मारहाण; चौघांना अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/GANG-ARREST-696x447-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर कोयता, पट्टा, हाताने व लाथाबुक्क्याने मारून जखमी केले. तसेच तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) रात्री दहा ते अकरा वाजताच्या कालावधीत बारणे कॉर्नर, थेरगाव आणि पुनावळे येथील जंगलात घडली.
सौरभ काळे (रा. थेरगाव), दीपक तेलंगे (रा. थेरगाव), बंटी लोखंडे (रा. वाल्हेकरवाडी), सुनील सुभाष जाधव (रा. थेरगाव), अरविंद मुन्ना शर्मा (रा. थेरगाव), हिरा शेख (रा. पुनावळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक सुभाष आल्हाट (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बारणे कॉर्नर थेरगाव येथे असताना आरोपी कारमधून आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करून कारमध्ये बसवले. पुनावळे येथील जंगलामध्ये नेले. आरोपींनी फिर्यादीला कोयता, पट्टा, हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीला वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन जवळ सोडून निघून गेले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.