पिंपळे-सौदागर येथील काटे परिवारातर्फे विवाहसोहळ्यानिमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागास ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट
![Kate family from Pimple-Saudagar visits Oxygen Concentrator to NMC Health Department for wedding](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/1-1-scaled-1.jpg)
पिंपरी |
राज्यात व शहरातील कोरोनाचे सावट लक्षात घेऊन पिंपळे सौदागर येथील काटे परिवाराने अनावश्यक खर्च टाळून लग्नसमारंभ शासनच्या अटीनुसार करत व्यर्थ खर्च टाळून महापालिकेच्या आरोग्य विभागास ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते वैद्यकीय आधिकारी डॉ.पवन साळवे यांच्याकडे हे ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर सुपूर्द करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसर्या लाटेचा सामना करताना ऑक्सीजन अभावी अनेक लोकांना नाहक त्रास झाला.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने अनेक कंपनी सीएसआर फंडातून पालिकेला वैद्यकीय साधने देत आहेत. तर पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूलचे जगन्नाथ काटे व काटे परिवाराने संकट काळात माणुसकीची भावना आधिक बळकट करण्यासाठी महामारीच्या काळात मदतीचा हात देत समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. जगन्नाथ काटे यांची कन्या प्रणिता हीचा वाकड येथील अरुण पंढरीनाथ पवार यांचे चिरंजीव अक्षय यांच्याशी विवाह सोहळा साध्या पद्धतीने संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने काटे परिवारातर्फे महापालिकेच्या आरोग्य विभागास दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर भेट देण्यात आले. काटे परिवाराकडून घेण्यात आलेल्या या स्त्युत्य निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वाचा- महापालिकांना तसा सरसकट आदेश द्यावा; मनसेची ठाकरे सरकारकडे महत्त्वाची मागणी