Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कशाळ ग्रामस्थांचा महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा

पिंपरी : आंदर मावळातील कशाळ गावच्या ग्रामस्थांचा मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी-भाजप-शिवसेना-आरपीआय-स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कशाळ गावातील ग्रामस्थांनी आमदार शेळके यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा जाहीर केला.

कशाळ ग्रामस्थांनी दाखविलेले प्रेम आणि विश्वासाबद्दल आमदार शेळके यांनी सर्वांचे आभार मानले. तुमची साथ, विश्वास आणि पाठबळ विकासाच्या प्रवासाला नवी ऊर्जा देत राहील. आपल्या प्रत्येकाच्या सहकार्यातूनच आपण एक उज्ज्वल आणि समृद्ध भविष्य घडवू शकतो. या एकतेच्या शक्तीने आपल्या गावच्या विकासाचे ध्येय निश्चितच गाठू हा विश्वास सर्वांना देतो,असे शेळके म्हणाले.

हेही वाचा    –      ‘विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’; ICU मधून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान 

कशाळ गावात अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी बांधणे, तलाठी कार्यालय बांधणे, क्रीडा साहित्य, व्यायामशाळा साहित्य, साकव पुलाची उभारणी, वडेश्वरला जोडणारा पूल बांधणे व मुख्य रस्ते सुधारणा करणे इत्यादी कामांसाठी आमदार शेळके यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आमदार शेळके यांना धन्यवाद दिले व निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी कशाळ गावातील जेष्ठ मंडळी, माजी सरपंच, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button