TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हॉकर्स झोन निर्मितीतून फेरीवाल्यांना न्याय द्या : बाबा कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात फेरीवाल्यांसाठी लवकर हॉकर्स झोनची निर्मिती होणे गरजेचे आहे. तसेच खऱ्या फेरीवाल्यांना न्याय द्यावे, अशी मागणी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेत शहर फेरीवाला समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी फेरीवाल्यांच्या रखडलेल्या मागण्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठेवण्यात आल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 2007 साली देशातील पहिला फेरीवाला कायदा व्हावा यासाठी टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीच्या वारंवार संघर्ष करण्यात आला. पंचायतिचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 2005 ते 2007 सलग 3 वर्ष मोर्चे, आंदोलन, धरणे करून सतत आवाज उठवण्यात आला आहे, बाबा कांबळे यांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये फेरीवाला कायदा मंजूर झाला आहे.
फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्यांपैकी टपरी, पथारी, हातगाडी पंचायत शहरातील सर्वात मोठी संघटना आहे. फेरीवाल्यांबाबत अधिकारी बदलले की धोरणे बदलतात. मागील अनेक वर्षात फेरीवाल्यासाठी कायदा होऊनही त्यांचे पुनर्वसन झाले नाही. हॉकर्स झोनची निर्मिती झाली नाही. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या काळातील शहरातील गोरगरीब टपरी धारकांवर अमानवीपणे कारवाई झाली. आपल्या काळात तरी गोरगरीब टपरी धारकांना न्याय मिळेल. त्यांचे जीवन सुसह्य होईल. फेरीवाला धोरणाला गती मिळेल. हॉकर्स झोनला गती मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे बाबा कांबळे म्हणाले.
या वेळी संघटनेच्या वतीने विविध मागण्या ठेवण्यात आल्या. महापालिकेच्या मोकळ्या जागेमध्ये प्रशस्त हॉकर्स झोन निर्माण करण्यात यावे. हॉकर्स झोनची लांबी व रुंदी किमान दहा बाय दहाची असावी. त्या ठिकाणी पाणी लाईट व बाथरूम या सर्व सुविधा असाव्यात. खरे गरजू व ते प्रत्यक्ष व्यवसाय करतात, त्यांनाच हॉकर्स झोन मध्ये स्थान मिळावे. भाड्याने टपऱ्या देऊन त्याचे भाडे घेणाऱ्या व्यक्तीवर मनपाच्या वतीने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. संबंधित व्यक्तीचा परवाना रद्द करण्यात यावा. फेरीवाल्यांचा दर 5 वर्षाला सर्वे करणे बंधनकारक आहे. अतिक्रमण करणे अगोदर टपरी धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे. नो-हॉकर्स झोन रस्त्यावरील फेरीवाल्यांचे हॉकर्स झोन मध्ये पुनर्वसन करण्यात यावे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button