Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

मास्टर माईंड स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

शिक्षण विश्व : आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’

पिंपरी-चिंचवड: दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मास्टर माईंड स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले. या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालकांनी देखील मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाचे विविध प्रकार सादर केले.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही होती. या थीमच्या माध्यमातून वैयक्तिक आरोग्य आणि पर्यावरणातील संतुलन यामधील संबंध स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांना या संदेशाचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि त्यांना आरोग्यविषयी जागरूक केले गेले.

‘आरोग्याद्‌बलमायुष्यं सुखं च लभते महत्‌’ या संस्कृत सूक्तीचा अर्थ सांगत, चांगल्या आरोग्यासाठी योग हा अत्यावश्यक मार्ग आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले. शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्राणायाम, सूर्यनमस्कार, विविध योगासने आणि ध्यानधारणा यांचा सराव केला. शिक्षक आणि पालकांनीही यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.

हेही वाचा –  विधानभवनमध्ये दोन दिवसीय संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन….

या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी योगाच्या महत्त्वावर आधारित लघुनाटिका सादर केली आणि नृत्याद्वारे विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी नियमित योगसाधना करण्याची शपथ घेऊन केला.

प्रेरणादायी अन्‌ आरोग्यदायी दिवस…

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्र, त्याचे फायदे, मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम आणि आत्मविश्वास वृद्धी यांचे महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाले. एकंदरीत, मास्टर माईंड स्कूलमध्ये झालेला योग दिनाचा कार्यक्रम प्रेरणादायी आणि आरोग्यदायी ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button