शहर पोलीस दलातील 16 निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
![Internal transfers of 16 inspectors in the city police force](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/police-2.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 16 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंतीनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.पुढील तीन ते चार महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक आहे. निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आणखी काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बदली झालेले पोलीस निरीक्षक – (कुठून कुठे)
किशोर ढोमन पाटील – नियंत्रण कक्ष ते चिंचवड पोलीस ठाणे (गुन्हे)
रुपाली प्रल्हाद बोबडे – नियंत्रण कक्ष ते पिंपरी पोलीस ठाणे
रावसाहेब बापूराव जाधव – नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)
दीपक रामचंद्र साळुंखे – नियंत्रण कक्ष ते भोसरी वाहतूक आणि वाहतूक व नियोजन विभाग
रणजित नारायण सावंत – नियंत्रण कक्ष ते तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे
रामचंद्र नारायण घाडगे – नियंत्रण कक्ष ते विशेष शाखा 1
मधुकर माणिकराव सावंत – नियंत्रण कक्ष ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)
सुनील जनार्दन टोणपे – वाकड पोलीस ठाणे ते सांगवी पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)
विश्वजित खुळे – चिंचवड पोलीस ठाणे ते निगडी पोलीस ठाणे (गुन्हे)
राजेंद्र जयंतराव निकाळजे – नियंत्रण कक्ष ते देहूरोड पोलीस ठाणे (गुन्हे)
वैभव काशीनाथ शिंगारे – तळवडे वाहतूक ते चाकण पोलीस ठाणे
श्रीराम बळीराम पौळ – खंडणी विरोधी पथक ते रावेत पोलीस चौकी
वसंतराव दादासाहेब बाबर – आर्थिक गुन्हे शाखा ते चिखली पोलीस ठाणे (वरिष्ठ निरीक्षक)
सतीश दत्तात्रय माने – चिखली पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष
शहाजी नारायण पवार – तळेगाव दाभाडे ते नियंत्रण कक्ष
अजय विनायक जोगदंड – हिंजवडी पोलीस ठाणे ते खंडणी विरोधी पथक
याव्यतिरिक्त आठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षातून विविध शाखा आणि पोलीस ठाण्यांशी बंदोबस्त आणि कामकाजाच्या दृष्टीने प्रशासकीय कारणास्तव संलग्न करण्यात आले आहे.
17 निःशस्त्र सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपात बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच 31 पोलीस उपनिरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.