Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बिम लाईट, लेझर लावणे पडले महागात

पिंपरी चिंचवड पोलिसांचा मंडळाच्या अध्यक्षांना दणका

शिक्षा होण्याची शहरातील पहिलीच घटना

पिंपरी चिंचवड : गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रखर बिम लाईट व लेझर लाईटचा वापर करण्यास पोलिसांनी स्पष्ट मनाई केली असतानाही सांगवी हद्दीत एका मंडळाने आदेश धाब्यावर बसवत लेझर व बिम लाईटचा वापर केला. याप्रकरणी संबंधित मंडळाध्यक्षास न्यायालयाने दंडासह तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अशी शिक्षा होण्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे.

भैरवनाथ मित्र मंडळ, वैद्यवस्ती, पिंपळे गुरव या मंडळाचे अध्यक्ष गोपी पंढरीनाथ लोखंडे (वय 34, रा. वैद्यवस्ती, पिंपळे गुरव, पुणे) यांनी विसर्जन मिरवणुकीत प्रतिबंधित प्रखर बिम व लेझर लाईटचा वापर केला होता. गणेशोत्सव काळात लेझर व बिम लाईटमुळे नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते, तसेच वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिसांनी विविध मंडळांची बैठक घेऊन तोंडी व लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.30 ते 11.45 या वेळेत लोखंडे यांनी पिंपळे गुरव परिसरातील विसर्जन मिरवणुकीत या मनाई आदेशाचे उल्लंघन केले.या संदर्भात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्धचे सबळ पुरावे सादर केल्यानंतर त्यास न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, पिंपरी यांनी दि. 19 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीस एक हजार रुपये दंड व दोन दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

हेही वाचा –  वाकडमध्ये तीन दिवसीय श्रीकृष्ण कथासोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न..!

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, अमोल नांदेकर, उपनिरीक्षक रोहित पाटील, विजय शेलार, अंमलदार विशाल चौधरी, प्रमोद जराड व तुषार साळुंखे यांच्या पथकाने केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की यापुढे विसर्जन मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांमध्ये लेझर व बिम लाईटचा वापर केल्यास अशाच प्रकारची कठोर कारवाई नक्की होणार आहे.सांगवी मधील उत्सवाच्या दरम्यान ज्या ठिकाणी डी. जे. चा अतिरेक झाला त्या ठिकाणी आम्ही कारवाई केली. डी. जे च्या प्रकरणात आम्ही गुन्हे दाखल केले आणि आज मंडळाच्या अध्यक्षाला शिक्षा झाली आहे.यामुळे आता पुढे डी. जे लावताना ही कारवाई कायम लक्षात राहील.

-जितेंद्र कोळी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सांगवी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button