Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
इंद्रायणी महिला प्रतिष्ठानतर्फे इंद्रायणीनगर-मोशी प्राधिकरणमध्ये हळदी कुंकू समारंभ उत्साहात

- शिवांजली सखी मंचच्या पूजा लांडगे, निलम लांडगे यांचा पुढाकार
पिंपरी । प्रतिनिधी
आमदार महेश लांडगे यांच्या सौभाग्यवती आणि शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे आणि इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा नीलम शिवराज लांडगे यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.सौभाग्याचं लेणं असलेल्या हळदी कुंकू समारंभात भोसरी-इंद्रायणीनगर आणि परिसरातील विविध सोसायटीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
महिलांसाठी सौभाग्याचं खरं लेणं म्हणजे हळदी-कुंकू त्यामुळे या कार्यक्रमाला मोशी प्राधिकरण परिसरातील माता- भगिणींसाठी इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा महेश लांडगे आणि निलम शिवराज लांडगे यांच्या पुढाकाराने हा स्नेहसोहळा आयोजित करण्यात आला.