पाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये देशभक्तीचा अभिमानदायक संगम

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपूर्ण मानवंदना देत उपस्थितांचे मन जिंकले

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साह, गौरव आणि राष्ट्रभक्तीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने झालेल्या ध्वजारोहण समारंभाचे मुख्य आकर्षण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपूर्ण मानवंदना देत उपस्थितांचे मन जिंकले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सहभागाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशप्रेम जागवणारे गीत, नृत्य, आणि भाषणांचा समावेश होता. अर्णव बाबर, आर्यन यादव, आणि गौरवी मौका या विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणांनी स्वातंत्र्याचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. बिंदू सैनी होत्या. त्यांच्यासोबत उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, तसेच विभाग समन्वयक दर्शना कामत, पृथा वैद्य, वंदना सांगळे, अर्चना प्रभुणे, नयना तारू, सुप्रिया नितीन यांची उपस्थिती होती. सर्व शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक शिक्षक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दिवशी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकवर्गास स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भार्गवी वडणेरकर आणि अन्वी काळे हिने केले. पाहुण्यांची ओळख विद्यार्थी प्रतिनिधी नील भुजबळ याने करून दिली, तर आभारप्रदर्शन सई घारगे हिने अत्यंत मनोगतपूर्वक केले. देशाच्या स्वातंत्र्याच्या स्मृती उजळवत, भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याचा निर्धार करत, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल च्या आवारात एक अभिमानास्पद आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम”च्या सामूहिक गाण्याने झाली आणि सर्व उपस्थितांच्या मनात देशप्रेमाची नवी उमेद जागवली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button