‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत होणाऱ्या घरकुलाच्या डेमो हाऊसचे उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/FB_IMG_1641971626066.jpg)
– आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उदघाटन
– पंचायत समितीच्या आवारात उभारले डेमो हाऊस
पिंपरी l प्रतिनिधी
‘महा आवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत घरकुल योजना राबवली जात आहे. मावळ तालुक्यात होणाऱ्या घरकुलाच्या प्रतिकृतीचे (डेमो हाऊस) उद्घाटन मावळ पंचायत समिती आवारात आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार सुनील शेळके, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सभापती ज्योती शिंदे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव म्हाळसकर, साहेबराव कारके, महादू उघडे, शांताराम कदम, सुवर्णा कुंभार, नामदेव पोटफोडे, घरकुल विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, खादी ग्रामोद्योग अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कैलास गायकवाड, देविदास गायकवाड तसेच सरपंच, सदस्य, घरकुल लाभार्थी, ग्रामसेवक, अधिकारी उपस्थित होते.
मावळ पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय कार्यशाळा व महा आवास अभियान ग्रामीण टप्पा-2 या शंभर दिवसाच्या उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन संपन्न झाले. या कार्यशाळेसाठी ग्रामसेवक ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले. महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना ग्रामपंचायती, घरकुल लाभार्थी, तसेच सर्वोत्कृष्ट क्लस्टर आदींना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.