तळेगाव येथे रिक्षा चालकाने केला अल्पवयीन मुलीचा पाठलाग आणि विनयभंग
![धक्कादायक! भर दिवसा १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/rape-miner.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचा तिच्या घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2021 ते 20 फेब्रुवारी 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.
सौरभ सतीश कांबळे (वय 21, रा. वडगाव मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ कांबळे हा गणेश शिरसाट यांच्या रिक्षावर चालक म्हणून काम करतो. त्याने फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीला लैंगिक त्रास देण्यासाठी तिचा घरापासून शाळेपर्यंत पाठलाग केला. तसेच तळेगाव नगरपरिषद जवळ मुलीचा हात पकडून ‘त्याचे तिच्यावर प्रेम आहे व भेटण्यासाठी त्याच्या सोबत चल’, असे म्हणाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.