‘आयआयबी’ मध्ये विद्यार्थ्यांचे सलग १५ तास अभ्यास करत ‘‘रेकॉर्ड’’
शिक्षण विश्व : देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प

पिंपरी- चिंचवड | आयआयबी विद्याधाम पुणे कॅम्पसमध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिनी 76 विद्यार्थ्यांनी तब्बल 15 तास अभ्यास करून आगळे वेगळे रेकॉर्ड स्थापित करीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला.
“आयआयबी” इन्स्टिटयूट विद्याधाम पुणे येथील कॅम्पसमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज वंदन करण्यात आले. यावेळी माजी महापौर योगेशजी बहल, आयआयबी पुणे विभागाचे संचालक ॲड.महेश लोहारे, दैविक मंठाळे, ॲड. कल्पना लोहारे , सह व्यवस्थापक प्रवीण देसाई उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा : भारत विरुद्ध इंग्लंडमधील तिसरा सामना आज..! कोण बाजी मारणार?

विद्यार्थ्यांनी सलग 15 तास अभ्यास करून आगळे वेगळे रेकॉर्ड स्थापित करीत उत्कृष्ट डॉक्टर, इंजिनिअर बनून देशाच्या प्रगतीमध्ये भविष्यातील दर्जेदार योगदानचा दृढ संकल्प केला. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.




