Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणे

मी लोकांची कामे करिन, जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन हीच माझी गॅरंटी : शिवाजीराव आढळराव पाटील

आम्ही फक्त 'राउंड'वरचे नाही तर 'ग्राउंड'वरचे कार्यकर्ते : आढळराव पाटलांचा कोल्हेंना टोला

पिंपरी : ‘‘मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे’’ असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर महामार्ग, नाशिक महामार्ग, तसेच सोलापूर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या प्रश्नासाठी मी खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला त्यांनी त्याबाबत योग्य नियोजनही केले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीला सामोरे जातोय. सदैव जनतेसाठी उपलब्ध राहून जनतेची कामे करण्याची माझी गॅरंटी आहे. असेही आढळराव पाटील म्हणाले.

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे तुमच्या प्रचारात दिसत नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर आढळराव पाटील यांनी सांगितले कि, आमदार महेश लांडगे दररोज माझ्या संपर्कात आहेत, त्यांचा प्रचार, बैठका दिवसरात्र सुरु असून त्यांचे सर्व सहकारी सक्रियपणे प्रचारात सहभागी होत आहेत असे आढळराव पाटील म्हणाले. सध्या उन्हाळा वाढला असला तरीही जनतेसाठी ऊन, वारा, पावसाची आम्ही कधी तमा बाळगली नाही, नेहमी लोकांसाठी धावून गेलो. हि माझी शेवटची निवडणूक आहे या आवाहनामुळे कोल्हेंना वाईट वाटले असेल किंवा ते भावून झाले असतील तर मी पुन्हा निवडणूक लढवीन.. मुळात कोल्हे यांच्यात ‘मी’ पणा दिसतोय, निवडणूक त्यांच्या हातातून निसटल्याची हि लक्षणे आहेत असा टोला आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लगावला

प्रचारादरम्यान, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ट्रस्टचे मा. नगरसेवक वसंत बोराटे, शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतीश बारणे, गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते, पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते पाटील, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कविता अल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक अभिमन्यू लांडगे, मा. शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, राष्ट्रवादी उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, उद्योजक प्रकाश अल्हाट, उद्योजक संतोष सस्ते, सामाजिक कार्यकर्ते राघू बनकर, बबन आल्हाट, दैतुरे मामा, आशा मिसाळ, रोहिदास हवालदार, उद्योजक प्रदीप अल्हाट, उद्योजक संदीप अल्हाट, धर्माजी अल्हाट, हिरामण अल्हाट, बाबासाहेब अल्हाट, अर्जुन बनकर, राजू शेठ सस्ते, रामदास बोराटे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button