पिंपरी / चिंचवड
पती आणि सासूला समोरासमोर दारू पिता येत नसल्याने विवाहितेचा छळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/molestation-1483757211-696x447.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पती आणि सासूला समोरासमोर दारू पिता येत नसल्याचा राग दोघांनी विवाहितेवर काढला. विवाहितेला शिवीगाळ मारहाण करून क्रूर वागणूक दिली. ही घटना 27 फेब्रुवारी 2021 ते 6 मार्च 2022 या कालावधीत बावधन येथे घडली.
पती अनिकेत जयंत जाधव (वय 34, रा. सदाशिव पेठ पुणे) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि सासू यांना विवाहितेसमोर दारू पिता येत नाही, या कारणावरून आरोपींनी विवाहितेचा छळ केला. विवाहितेला वारंवार मानसिक त्रास देऊन शारीरिक छळ करून हाताने मारहाण, शिवीगाळ करून क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.